भुसावळात नवरात्रोत्सव शांततेत पार पडणार : 40 उपद्रवी राहणार शहराबाहेर ; पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत

40 उपद्रवींना शहरबंदीचा प्रस्ताव सादर : शेवटचे तीन दिवस राहावे लागणार बाहेर


Navratri festival will be celebrated peacefully in Bhusawal: 40 troublemakers will remain outside the city; Deputy Superintendent of Police Sandeep Gavit भुसावळ (21 सप्टेंबर 2025) : आगामी नवरात्रोत्सवात शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलले आहेत. नवरात्रोत्सवातील शेवटच्या तीन दिवसांत शहरातील तब्बल 40 उपद्रवींना शहरबंदी करण्याचा प्रस्ताव तयार करून अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती डीवायएसपी संदीप गावीत यांनी दिली.

उपद्रवी पोलिसांच्या रडारवर
शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे आणि तालुका पोलीस ठाणे हद्दीतील उपद्रवींविरोधात हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत गोंधळ घालणारे, पोलीस सूचनांकडे दुर्लक्ष करणारे, नागरिकांना त्रास देणारे व कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारे घटक यात समाविष्ट करण्यात आले आहेत.






अपर पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव
या संदर्भात शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, भुसावळ तालुका निरीक्षक महेश गायकवाड यांनी सविस्तर प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव प्रथम उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आला व तेथून तो जळगाव येथील अपर पोलिस अधीक्षक कार्यालयात सादर करण्यात आला. याबाबतचे आदेश लवकरच निघणार असून, उत्सव काळात नागरिकांनी सुरक्षिततेसाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन डीवायएसपी संदीप गावीत यांनी केले आहे.

प्रतिबंधात्मक कारवाई होणार
प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून वादग्रस्त गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीविरूध्द सुध्दा प्रतिबंध्दात्मक कारवाईची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यांना प्रतिबंध्दात्मक कारवाई करण्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे, त्या दृष्टीने पोलिसांकडून प्रतिबंध्दात्मक कारवाई केली जात आहे, असेही डीवायएसपी गावीत यांनी स्पष्ट केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !