नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योजक व्हा : भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात अश्विन कुमार परदेशी
Don’t chase jobs, become an entrepreneur yourself : Ashwin Kumar Pardeshi at Nahata College in Bhusawal भुसावळ (22 सप्टेंबर 2025) : विद्यार्थ्यांनी केवळ डिग्री घेऊन नोकरीसाठी व्यावसायीक संस्थांवर अवलंबून न राहता स्वतः उद्योजकतेकडे वळले पाहिजे व नोकरीच्या मागे न धावता नोकरी देणारे झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना उद्योजकाचे स्वप्न बघण्याचे व त्यांना खरे करण्याचे आव्हान मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ ओबेनोल प्रा.लि.व डायरेक्टर ऑफ शेती सेवा टेक्नो सर्विस छत्रपती संभाजीनगरचे अश्विन कुमार परदेशी यांनी येथे केले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
भुसावळातील कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत युवा उद्योजक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.ममताबेन पाटील उपस्थित होत्या. कल्पेश इंगळे, सचिन पाटील, प्रेम सागर सिंगतकर, वाणिज्य व्यवस्थापन विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.





योजनांची दिली माहिती
अश्विन कुमार परदेशी यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सध्याची अर्थव्यवस्था, उद्योजकता व बेरोजगारी बद्दलची परिस्थितीबाबत अवगत करून देऊन विद्यार्थ्यांना आपले करिअर यशस्वीरित्या कसे घडवता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी युवा उद्योजकांसाठी भारत सरकारच्या पंतप्रधान उद्योजकता विकास योजनांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थसहाय्य देणार्या योजनांची माहिती दिली.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.आर.वाणी यांनी आपल्या मार्गदर्शनात समाजात युवा उद्योजकांचे महत्त्व सांगितले. प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख प्रा.डॉ. ममताबेन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.एकता बजाज यांनी तर आभार प्रा.पूजा भंडारी यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.डी.एन.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. वाणिज्य व्यवस्थापन विभागातील प्रा.डॉ.के.पी.पाटील, प्रा.डॉ.रश्मी शर्मा, प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.भूषण चौधरी, प्रा.खिलेश पाटील, प्रा.डॉ.सपना जंगले, प्रा.ललिता पाटील, प्रा.स्वाती शेळके, प्रा.सोनिया टेकवाणी, प्रा.प्रियंका खडसे, प्रा.नंदिनी दायमा, प्रा.वृषाली पाटील, त्रीविक्रम वारके यांनी परिश्रम घेतले.
