भुसावळात मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी घटस्थापना
Ghatsthapana at the residence of Minister Sanjay Savkare in Bhusawal भुसावळ (23 सप्टेंबर 2025) : शहराचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात व मनोभावे घटस्थापना करण्यात आली. मंत्री संजय सावकारे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे व सुनिधी सावकारे प्रसंगी उपस्थित होत्या.
दरवर्षी उत्साहात स्थापना
मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्र हा आदिशक्तीचा उत्सव मनवला जातो. दुर्जनांचा नाश व सज्जनांचे रक्षण करणार्या आदिमायेची या काळात आराधना केली जाते.





