निवृत्त मुख्याध्यापक एस.आर.फेगडे यांना रोटरी क्लबचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर
Rotary Club announces ‘Jeevan Gaurav’ award to retired principal S.R. Phegde यावल (25 सप्टेंबर 2025) : रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणतर्फे सात शिक्षकांची नेशन बिल्डर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. क्लबचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी व सचिव रोहित शिंदे यांनी ही माहिती दिली. निवृत्त मुख्याध्यापक एस. आर. फेगडे यांना रोटरी क्लबतर्फे जीवन गौरव विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड
बागलाण तालुक्यातील आशा अहिरे (प्रगती विद्या मंदिर, सटाणा), हर्षदा चव्हाण (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गढीपाडा), विकास सोनवणे (जनता विद्यालय, अंतापबर), किरण पाटील (लोकनेते पं. घ. पाटील मराठा हायस्कूल, सटाणा), गणेश वाघ (क्रीडा शिक्षक, बागलाण इंग्लिश मीडियम स्कूल, सटाणा), दीपक जाधव (कलाशिक्षक, आदर्श इंग्लिश मीडियम स्कुल सटाणा) या शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवार्ड आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.





