वरणगाव परिसरात लंपी आजाराची डोकेदुखी : मोकाट कुत्र्यांनी वाढवली समस्या
Lumpy disease headache in Varangaon area: Stray dogs exacerbate the problem भुसावळ (26 सप्टेंबर 2025) : वरणगावसह शहरात सध्या लंपी आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. बाहेरून अज्ञातांनी कुत्रे सोडल्यानंतर हे मोकाट कुत्रे जनावरांवर हल्ले करीत असून जनावरेदेखील नागरिकांवर हल्ले करीत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
पिसाळलेल्या जनावरांकडून नागरिकांवर हल्ले
तिरंगा सर्कल परिसरात एका पिसाळलेल्या गायीने ज्येष्ठ महिला रेणुका साबळे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. भास्कर गावंडे यांच्या चहाच्या स्टॉलजवळ ही घटना घडली. अशाच पद्धत्तीने गुरांनी अनेकांवर हल्ले केल्याने नागरिक जखमी झाले आहेत.





गायींसह इतर जनावरांमध्ये लम्पीची लागण झाल्याने भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी यांनी नगरपरिषद व पशुवैद्यकीय विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, शहरातील मोकाट कुत्रे आणि जनावरे लोकांच्या जिवितास धोका निर्माण करत आहेत. लंपीबाबत प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास स्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या मागणीसाठी झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष सुनील काळे, नाना चौधरी, मिलिंद भैसे, कृष्णा माळी, मयूर शेळके, फझल शेख, अजमल खान, गोलू राणे, मिलिंद मेढे, पप्पू ठाकरे, बळीराम दादा सोनवणे, योगेश माळी, रमेश पालवे यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
