उत्राणच्या जुगार्‍यांचा कासोदा पोलिसांनी डाव उधळला :  62 हजारांचा मुद्देमाल जप्त


Kasoda police take action against gambling : Foursome caught कासोदा (26 सप्टेंबर 2025) : कासोदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत यांनी अवैध धंद्यांविरोधात धाडसत्र सुरू केल्याने अवैध धंदे चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. उत्राण शिवारात जुगार्‍यांनी डाव मांडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापेमारी करीत चार आरोपींच्या मुसक्या बांधल्या तर एक संशयीत पसार झाला. संशयीतांकडून 61 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार. 24 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता करण्यात आली.

पथक येताच संशयीत पसार
कासोदा गावाला लागून असलेल्या उत्राण शिवारातील शंकर रामदास चौधरी यांच्या शेतात काही इसम पैसे लावून पत्त्याचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती कासोद्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी हवालदार श्रीकांत गायकवाड, योगेश पाटील, दीपक देसले यांचे पथक घटनास्थळी रवाना कले व पथकाने चौकडीला ताब्यात घेतले मात्र एक संशयीत पसार झाला.

या आरोपींवर कारवाई
रामचंद्र दगडू कोळी (30), हेमंत राजू भोई (25), नारायण सुरेश चौधरी (33), गोरख धर्मा गोकुळ (40, सर्व रा.उत्राण, ता.एरंडोल) यांना अटक करण्यात आली उत्तम धनराळे हा पसार झाला. संशयीतांकडून पाच हजार 950 रुपयेांची रोकड 10 हजारांचा मोबाईल, व 45 हजारांची मोटारसायकल असा एकूण 61 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस नाईक दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !