विसर्जन मिरवणुकीत रात्री दहा पर्यंतच वाद्याला परवानगी : पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत

ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळण्याच्या भुसावळात दुर्गोत्सव मंडळ पदाधिकार्‍यांना सूचना


Musical instruments are allowed in immersion processions only till 10 pm : Deputy Superintendent of Police Sandeep Gavit भुसावळ (29 सप्टेंबर 2025) : दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत रात्री दहा पर्यंतच वाद्याला परवानगी असून मंडळांनी ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावेत, असे आवाहन भुसावळचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी येथे केले. शहरातील खाचणे हॉलमध्ये आयोजित मंडळ पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते.

क्रमांकानुसार न्यावे वाहन
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ म्हणाले की, काही मंडळाचे पदाधिकारी देवीची मूर्ती असलेले वाहन चुकीच्या मार्गाने घेऊन येतात. यामुळे गोंधळ उडतो. प्रत्येक मंडळाने नृसिंह मंदिराजवळून मिरवणुकीत लागावे. तेथे क्रमांक दिले जातील. त्यानुसार मिरवणूक पुढे जाईल. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत 52 मंडळांचा समावेश असेल. काही मंडळे मिरवणुकीत सहभागी न होता परस्पर सोयीच्या ठिकाणी विसर्जन करतात.






57 उपद्रवींना शहर बंदी
57 उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी शहरातील 57 उपद्रवींना शहरबंदीचे आदेश अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी काढले आहे. शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ पोलिस ठाणे व तालुका पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील हे उपद्रवी असून विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवसापासून ते तीन दिवस हा आदेश लागू असेल.

तर दाखल होईल गुन्हा
या बैठकीला डीजे व्यावसायिकांना सुद्धा बोलावले होते. त्यांना आवाज मर्यादेवर अंकुश ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. ध्वनिप्रदूषण झाल्यास दुसर्‍या दिवशी गुन्हा दाखल होईल, अशी तंबी पोलिसांनी दिली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !