नवरात्रोत्सवानिमित्त गुरुकुलात दांडियाचा जल्लोष


Dandiya celebrations at Gurukul on the occasion of Navratri festival भुसावळ (1 ऑक्टोंबर 2025) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील श्री स्वामिनारायण गुरुकुलात नवरात्रोत्सवानिमित्ते दांडिया महोत्सव उत्साहात साजरा झाला. पारंपारिक वेशभूषेत सजलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमाला रंगत आली.

नवरात्रोत्सवाचे गीते आणि ढाल-ताशांच्या तालावर दांडिया चा खेळ आनंद घेत विद्यार्थ्यांनी सादर करताना पारंपारिक संस्कृती सोबत एकात्मता, आनंद आणि बंधू भावाचा संदेश दिला.






या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळ भगत यांच्याहस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, अशा सण-उत्सवांच्या माध्यमातून आपल्याला संस्कृतीची जपवणूक आणि सामाजिक एकतेचा संदेश मिळतो. उत्सवामुळे शाळेचे वातावरण आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक अभिमानाने भरून गेलेले होते. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !