नंदुरबारमध्ये लॉकडाऊनमध्ये मद्य विक्री : बियर बारचा परवाना रद्द


नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असतानाही शहरातील कोरीट नाका परीसरातील बियर बार मधून मद्य विक्री सुरू असल्याने एलसीबीच्या पथकाने शनिवारी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने या बियरबारचा परवाना रद्द केला आहे. बियर बारच्या मागील बाजूने मद्याची विक्री सुरू असल्याची खात्री करण्यासाठी डमी ग्राहक पाठवल्यानंतर पथकाची खात्री होताच पथकाने छापा टाकला. यावेळी मनोज हिरालाल चौधरी यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने चोरटी विक्री केल्याची कबुली दिलयानंतर पथकाने त्याच्याकडून तीन लाख दोन हजार 305 रुपयांचे देशी विदेशी मद्य, बियरच्या बाटल्या मुद्देमाल जप्त केला. हॉटेलमालक दिलीप हिरालाल चौधरी व मनोज हिरालाल चौधरी या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचे परवाना रद्द करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !