मुस्लीम पटेल समाजाचा आदर्श पायंडा : कोरपावलीत साखरपुड्यात आटोपला विवाह
विवाहासाठी हज यात्रा करून आलेल्या हाजींनी घेतला पुढाकार
An ideal step for the Muslim Patel community: A wedding concluded in Korpavali with a bang यावल (6 ऑक्टोबर 2025) : यावल तालुक्यातील कोरपावली येथे रविवारी मुस्लिम पटेल समाजात एक आदर्श विवाह झाला. साखरपुड्याच्या उद्देशातून यावल शहरातील पटेल कुटुंब तिथे गेले होते. या छोटेखानी साखरपुड्यातच विवाह केला जावा व रूढी परंपरेला फाटा मिळावा यासाठी कंत्राटदार हाजी मुक्तार इसा पटेल यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकारातून सदर साखरपुड्यातच विवाह झाला. पटेल कुटुंबीयांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
असा घडला आदर्श विवाह
यावल शहरातील रहिवासी दानिश सईद पटेल यांचा साखरपुडा रविवारी सानिया तालेब पटेल (कोरपावली) सोबत होणार होता. दरम्यान या साखरपुड्याच्या छोटेखानी कार्यक्रमातच रूढी-परंपरांना फाटा देत, हळद लावणे, हळदीचा कार्यक्रम करणे, त्यानंतर वरात आणणे व वायफळ खर्च करणे अशा सर्व बाबी आणि रुढीपरंपरा टाळून आपण साखरपुड्यातच छोटेखानी निकाह लावून घ्यावा, असा पुढाकार यावलचे कॉन्ट्रॅक्टर हाजी मुक्तार इसा पटेल यांनी घेतला.





त्यांच्या या पुढाकाराला मोहम्मद रफीक पटेल (कोरपावली) यांनी सहमती दाखवली आणि वधू-वर मंडळींच्या पालकांनी देखील संमती दाखवली व छोटेखानी कार्यक्रमात रूढी-परंपरेला फाटा देत साखरपुड्यातच निकाह अर्थात विवाह लावण्यात आला.
यांची आदर्श विवाहाला उपस्थिती
याप्रसंगी अजित गणी पटेल, नसीर गनी पटेल, सादिक गनी पटेल, वसीम सिकंदर पटेल, रमीज सिकंदर पटेल, न्याजुद्दीन हैदर पटेल, हाजी समद चांद पटेल, शरीफ इसा पटेल, इकबाल इसा पटेल, आबुतालेब अफजल पटेल, मुक्तार पिरन पटेल, रशीद नबाब पटेल, आसिक मोहमंद पटेल, मुनाफ रहेमान पटेल, महमंद पटेल आदींची उपस्थिती होती. एकूणच रूढी, परंपरांना फाटा देत पटेल कुटुंबीयांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
