यावल शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद


यावल (6 ऑक्टोबर 2025) : यावल शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून गुरूवारी श्री दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली. यात मोठ्या संख्येत महिला व मुली सहभागी झाल्या. विविध मान्यवरांनी देखील या दौडमध्ये सहभाग नोंदवत नागरीकांचे लक्ष वेधले.

आरती करीत दौडला सुरूवात
शहरातील शिवतीर्थ बोरावल गेट येथून आरती करून मोठ्या उत्साहात श्री दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. ही दौड मेन रोडने, बारी चौक, बुरूज चौक, श्रीराम नगर, विरार नगर, श्री मनुदेवी मंदिरात आली व आरती झाली.






दुर्गा दौड कशासाठी? तर राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना नवरात्रीत अखंड नऊ दिवस आई तुळजाभवानीचा जागर करून आई जगदंबेच्या चरणी देव, देश, धर्मासाठी वरदान मागितलेले आशीर्वाद पुनररुपी मागण्याची प्रथा उपक्रम म्हणजेच श्री दुर्गा दौड श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून म्हणुन सुरू आहे.

नवरात्री घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ते विजयादशमी पर्यंत दररोज पहाटे सहा वाजेला देशभक्ती, धर्मभक्ती, राष्ट्रभक्तीपर गीते व श्लोक म्हणत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या राष्ट्रभक्ती धर्मभक्तीच्या मार्गावर जोमाने चालण्यास बळ मिळविण्यासाठी अवघी तरूण पिढी निर्व्यसनी राष्ट्रभक्त, धर्मभक्त, देशभक्त बनवण्यासाठी उगवती तरुण पिढी छ्त्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज या दोन महामृत्युंजय मंत्राच्या विचारांची कार्य कर्तृत्वाची ध्येय धोरणेच्या इच्छा-आकांक्षा बनवण्यासाठी हा दुर्गा दौडचा उपक्रम सुरू करण्यात आला. जात-पात, पक्ष, गट-तट संप्रदाय संघटना, हा कोण, मी कोण, तु कोण, हे काय, ते काय मानाच्या खुर्च्या आणि सन्मानाचे फेटे जुगारुन अखंड हिंदुस्थानाला भगव्या ध्वजाच्या छत्र छायेखाली आणण्यासाठी दोन पताकी भगव्या ध्वजाचे राज्य आणण्यासाठी जी रॅली काढण्यात येते त्याला श्री दुर्गामाता दौड असे म्हटले जाते, असे आयोजकांनी सांगितले.

यांचा दौडमध्ये सहभाग
या दौडमध्ये आमदार अमोल जावळे, डॉ.कुंदन फेगडे, डॉ.अभय रावते, उमेश फेगडे, नितीन महाजन, सलील महाजनसह मान्यवरांनी उपस्थिती दिली. यास दौडचे आयोजक सागर लोहार, उज्वल कानडे, कमलेश शिर्के, सुधाकर धनगर, राहुल कोळी, प्राची पाठक, दिगंबर स्वप्नील कारंडे, आकाश धनगर होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !