पाच लाखांची खंडणी घेताना धुळ्यातील जीएसटी अधिकार्यासह दोघे जाळ्यात
शिंदखेडा पोलिस ठाण्याचे डॅशिंग सहाय्यक निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी उघडकीस आला प्रकार

गणेश वाघ
Two people including a GST officer from Dhule caught while taking a ransom of Rs. 5 lakhs धुळे (7 ऑक्टोबर 2025) : गुटख्याच्या ट्रक सोडण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागणार्या धुळ्यातील जीएसटी अधिकार्यासह त्याच्या दोन खाजगी पंटरांना धुळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने जीएसटी विभागातील लाचखोर पुरते हादरले आहेत.
रवीकिरण दिसले असे अटकेतील जीएसटी अधिकार्याचे नाव असून ते धुळ्यात वर्ग दोनचे अधिकारी आहेत. त्यांच्या सोबत खाजगी पंटर सुनील भामरे व दिनेश मराठे यांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटखा सोडण्याच्या मोबदल्यात पाच लाखांची खंडणी
खास पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, शिरपूर टोलनाक्याजवळ गोविंद एचपी पेट्रोल पंपाजवळ आज पहाटे दिड वाजता आरोपींनी गुटख्याच आयशर ट0क अडवले व पाच लाखांची मागणी केली. पैसे मिळताच वाहन सोडण्याचे व गुटखा खाली उतरणार नाही, असेदेखील संशयीतांनी सांगितले मात्र शिंदखेडा हनुमंत गायकवाड हे रात्र गस्तीत असतांना त्याना हा प्रकार प्रत्यक्ष दिसला. त्यांनी खात्री केल्यानंतर आयशरमधे राजविलास आणि डायरेक्टर गुटखा असल्याने या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
