भुसावळात 25 जागांवर महिलांना संधी : काही प्रभागात नगरसेवकांची सौभाग्यवतींवर मदार !


Women get opportunities on 25 seats in Bhusawal : Many existing corporators have lost their jobs due to reservation ; Now the fate is on the fortunate women ! भुसावळ (8 ऑक्टोबर 2025) : नाशिक विभागातील एकमेव अ वर्ग पालिकेसाठी बुधवार, 8 रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली मात्र निघालेल्या आरक्षणामुळे काही प्रभागात विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट झाला असून त्यांना आता आपल्या सौभाग्यवतींना पुढे करावे लागणार आहे. शहरातील एकूण 25 प्रभागातील 50 नगरसेवक आता निवडून येणार असून इच्छुकांनी मोर्चे बांधणीला वेग दिला आहे. भुसावळ पालिकेची निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची होणार असून निष्क्रीय नगरसेवकांना नागरिक आता घरी बसवण्याच्या पावित्र्यात असल्याची चर्चा आहे.

25 प्रभागात आरक्षण
भुसावळ नगरपरिषद अंतर्गत एकूण 25 प्रभागांतील आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय (ना.मा.प्र.) आणि महिलांसाठी विविध प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. विशेषतः 50 टक्के महिला आता पालिकेवर निवडून जाणार आहेत.

असे आहे प्रभाग निहाय आरक्षण
प्रभाग क्रमांक 1, 4, 5, 8, 20, 22 या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती-जमाती महिलांसाठी आरक्षण देण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक 6, 12, 18, 19, 21, 25 हे प्रभाग इतर मागासवर्गीय (ना.मा.प्र.) महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

तसेच अनेक प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण आहे, जे राजकीय पक्षांसाठी समसमान संधी निर्माण करणारे ठरणार आहे.

राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भुसावळमध्ये ही आरक्षण सोडत एक निर्णायक टप्पा मानला जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही या यादीमुळे निवडणुकीची रणनीती नव्याने आखावी लागणार आहे. अनेक इच्छुक उमेदवारांना आपली तयारी पुन्हा तपासावी लागणार आहे तर काहींसाठी ही संधी सोन्याची ठरणार आहे. यामुळे स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला आहे.

निष्क्रिय नगरसेवकांना नागरिक घरी बसवणार !
गेल्या काही वर्षांपासून पालिकेवर प्रशासकराज असलेतरी यापूर्वी पाच वर्ष असलेल्या नगरसेवकांनी खरोखर प्रभागात नेमकी किती जनहिताची कामे केली? नागरिकांसोबत त्यांचा संवाद व संपर्क किती व कसा राहिला? नागरिकांच्या कामांना कितपत प्राधान्य राहिले ? या सर्व बाबींचा मतदार या निवडणुकीत करणार आहेत. निष्क्रीय नगरसेवकांना नागरिक घरी बसवतील हेदेखील तितकेच खरे !

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !