सावदा पालिकेवर महिलाराज येणार : 10 महिलांना मिळेल नगरसेवक पदाची संधी !

सावदा (8 ऑक्टोबर 2024) :सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी नगरपरिषद सभागृहात प्रभागनिहाय आरक्षण सोडत निघाली. महिला नगराध्यक्षांसह येथे 11 महिला नगरसेवक पदावर निवडून येणार आहेत.
असे आहे आरक्षण
आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक 1 मध्ये जागा 1 अ अनुसूचित जमातीसाठी आणि 1 ब ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2 अ ना.मा.प्र.साठी, तर 2 ब सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी आहे.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जातीसाठी जागा 3 अ राखीव असून 3 ब सर्वसाधारण (महिला) साठी निश्चित झाली आहे. हे दर्शवते की समाजातील मागासवर्गीय घटकांना आणि महिलांना राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे
प्रभाग क्रमांक 4 मध्ये 4 अ ना.मा.प्र.साठी तर 4 ब सर्वसाधारण महिलांसाठी ठेवण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक 5 मध्ये 5 अ ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी असून 5 ब सर्वसाधारण (उघड प्रवर्ग) साठी खुली आहे.
प्रभाग क्रमांक 6 आणि 7 मध्ये अनुक्रमे 6 अ आणि 7 अ या जागा ना.मा.प्र. (महिला) प्रवर्गासाठी राखीव असून उर्वरित 6 ब आणि 7 ब जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या आहेत
प्रभाग क्रमांक 8 मध्ये अनुसूचित जाती (महिला) साठी 8 अ जागा राखीव असून 8 ब सर्वसाधारण आहे.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये 9 अ सर्वसाधारण (महिला) साठी असून, 9 ब सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे.
प्रभाग क्रमांक 10 मध्ये 10 अ ना.मा.प्र.साठी राखीव असून, 10 ब सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली आहे.
या आरक्षण प्रक्रियेत महिलांसाठी एकूण 10 पेक्षा अधिक जागा राखीव झाल्याने हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आगामी निवडणुकीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
