मुक्ताईनगरातही बदलणारे समिकरणे : 17 प्रभागांसाठी आरक्षण जाहीर

Equations changing in Muktai Nagar too: Reservation announced for 17 wards मुक्ताईनगर (8 ऑक्टोबर 2024) : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या 2025 मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय आरक्षण सोडत बुधवार, 8 ऑक्टोबर 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात काढण्यात आली. 17 प्रभागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. महिलांसाठी 7 प्रभाग राखीव ठेवण्यात आले.
प्रभाग क्रमांक 1, 2, आणि 9, 12, 16 हे प्रभाग इतर मागासवर्गीय (ना. मा. प्र.) वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले असून तीन प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. प्रभाग क्रमांक 3, 4, 11, 13, आणि 14 हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असल्याने सर्वच नागरिकांना संधी मिळेल.
प्रभाग क्रमांक 5, 10, 15, आणि 17 हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठआहेत. यामुळे महिलांना या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार आहे.
प्रभाग क्रमांक 6 अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 7 अनुसूचित जमाती महिला, आणि प्रभाग क्रमांक 8 अनुसूचित जाती सामान्य या प्रवर्गांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्वालाही न्याय मिळणार आहे.
या आरक्षण प्रक्रियेवर स्थानिक राजकीय इच्छुकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांना आपला प्रभाग राखीव झाल्याने नाराजीचा सूर असलातरी नव्या चेहर्यांना यामुळे मात्र संधी मिळणार आहे.
