ग्राहकांच्या समस्या सोडवा : यावलच्या स्टेट बँकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवेदन

Solve customer problems: Statement from NCP Ajit Pawar group at State Bank of Yaval यावल (9 ऑक्टोबर 2025) : शहरताील स्टेट बँकेच्या शाखेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले व बँकेतील ग्राहकांना येणार्या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली.
बँकेत ग्राहकांना केवायसी करीत अडवले जाते, व्यवहाराकरीता आलेल्या नागरीकांना तीन ते 4 तास रांगेत उभे रहावे लागते. दुपारी एक तास सर्व व्यवहार बंद ठेवले जातात तेव्हा सदरील अडचणीमुळे ग्राहक वैतागला असुन या समस्या सोडवाव्या अशी मागणी आहे.
शहरातील सतोद रस्त्यावर भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत सोमवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे यांनी कार्यकर्त्यांसह जाऊन शाखा व्यवस्थापनांकडे निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, यावल तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून शहरासह ग्रामिण भागातील मोठ्या संख्येतील नागरीकांचे बॅकेत खाते आहे. व दैनदिनी विविध व्यवहारा करीता ग्राहक बँकेत येतात मात्र, येथे अनेक असुविधा निर्माण झाल्या आहेत अशी ग्राहकांची तक्रार आहे.
यात पैसे जमा करण्यासाठी व काढण्यासाठी लोकांना तीन ते चार तास रांगेत उभावे उभे राहावे लागत आहे. कर्मचार्यांची संख्या कमी आहे. ही गंभीर बाब असुन दुपारी एक ते दोन बँक पूर्णपणे बंद केली जाते. बाहेर उभे असलेल्या ग्राहकांना जेवणाची वेळ सांगून हाकलून दिले जाते. सुमारे एक वर्षापासून अनेक लोकांच्या तक्रारी येत आहे. केवायसी संदर्भात देखील बँकेकडून अडवणुक केली जाते. तेव्हा या समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणीचे निवेदन त्यांनी दिले आहे. सदर निवेदन देते प्रसंगी मोठ्या संख्येत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
