मानसिक प्रथमोपचार म्हणजे संकटात असलेल्या व्यक्तीला दिला जाणार आधार : समुपदेशक आरती चौधरी


भुसावळ (11 ऑक्टोबर 2025) : मानसिक प्रथमोपचार म्हणजेच संकटात असलेल्या व्यक्तीला दिला जाणारा भावनिक आधार आहे, यासाठी अश्या व्यक्तींना भावनिक आधाराची गरज असते, यासाठी आपण सुध्दा भावनिक व्हावे, असे प्रतिपादन समुपदेशक आरती चौधरी यांनी केले. सक्षम कॉन्सिलिंग आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्यातर्फे ‘मानसिक प्रथमोपचार’ या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.

राज्यभरातून वेबिनारमध्ये सहभाग
मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि प्रत्येक व्यक्तीने इतरांच्या भावनिक स्थितीबद्दल संवेदनशीलतेने प्रतिसाद द्यावा हा या वेबिनारचा मुख्य उद्देश होता. महाराष्ट्रातील विविध भागांतून भुसावळ व्यतिरिक्त पुणे, मुंबई अमरावती, सोलापूर, नाशिक येथुन तब्बल 47 जण या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.

वेबिनारच्या मुख्य वक्त्या समुपदेशक आरती चौधरी यांनी मानसिक प्रथमोपचार म्हणजेच संकटात असलेल्या व्यक्तीला दिला जाणारा भावनिक आधार या विषयावर अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. मनाला पहिली मदत म्हणून ओळखला जाणारा हा विषय प्रत्येकाने समजून घेणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी प्रभावी उदाहरणांसह स्पष्ट केले.

स्त्री रोग तज्ञ डॉ.सुवर्णा गाडेकर यांनी मानसिक व शारीरिक आरोग्याचा परस्पर संबंध मांडताना महिलांमधील भावनिक ताण आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटेरियन संजय चापोरकर यांनी केले.त्यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याच्या उपक्रमांचा उल्लेख करत मानसिक आरोग्यविषयक जनजागृतीची गरज अधोरेखित केली. सूत्रसंचालन क्षमा फेगडे यांनी केले. वेबिनारनंतर सहभागी व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !