दीपनगर केंद्रातून एक हजार मेगावॅटपेक्षा अधिक निर्मिती
पाऊस थांबल्याने वाढली विजेची मागणी

More than one thousand megawatts generated from Deepnagar center भुसावळ (12 ऑक्टोबर 2025) : दीपनगर औष्णिक केंद्रातून शनिवारी राज्याला एक हजार मेगावॅटपेक्षा अधिक विजेचा पुरवठा झाला. गेल्या आठवड्यापासून पाऊस थांबल्याने विजेचा वापर वाढत आहे. राज्याची वीज मागणी वाढून 26 हजार मेगावॅटवर पोहोचली आहे. यामुळे वीज नर्मितीमध्येही वाढ करण्यात आली आहे.
दीपनगरात कोळशाचा साठा मुबलक
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळसासाठा मुबलक आहे. यामुळे दीपनगरातील वीजनिर्मिती संचांतून निर्मिती केली जात आहे. दीपनगरातील संचांची क्षमता एक हजार 870 मेगावॅट आहे. यातून सरासरी एक हजार 10 मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात आली.
आगामी काळात दिवाळीत विजेची मागणी वाढली तरी दीपनगर केंद्रातून निर्मिती वाढवून पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यामुळे राज्यातील विजेची काही अंशी तुट भरुन काढण्यास मदत होणार आहे. दरम्यान दीपनगरात पावसाळ्यानंतरही यंदा कोळसासाठा समाधानकारक आहे. सध्या चांगल्या गुणवत्तेचा कोळसा मिळत आहे. यामुळे संच तीनमधून प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊन या संचातून विजेच्या निर्मितीचा टक्काही वाढला आहे.
