व्हॉटसअ‍ॅपची सेटींग ऑटो डाऊनलोड ठेवाल तर तुमचेही खाते होईल रिकामं : जळगावात व्यावसायीकाला पाच लाखांचा चुना


If you set WhatsApp’s setting to auto download, your account will also be empty: Businessman in Jalgaon cheated of Rs 5 lakh जळगाव (11 ऑक्टोबर 2025) : सायबर भामट्यांनी विविध पद्धत्तीने नागरिकांना गंडवल्याचे प्रकार नेहमीच घडतात. त्यात आता मोबाईलमध्ये एपीके फाईल पाठवून खाते रिकामे करण्याचा प्रकार जळगावात घडला आहे. मोबाइलमधील व्हॉट्सपची सेटिंग ‘ऑटो डाऊनलोड’वर असताना एपीके फाइल डाऊनलोड झाली आणि जळगावातील व्यावसायीकाच्या खात्यातून तब्बल चार लाख 64 हजार 439 रुपये गायब झाल्याची घटनाप 9 ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले व्यावसायीकासोबत ?
नीलेश हेमराज सराफ (49, रा.अजय कॉलनी) यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर एका मोबाईल क्रमांकावरून कस्टमर्स सर्व्हिस सपोर्ट ही एपीके फाइल आली. त्यावेळी त्यांच्या व्हॉटसअ‍ॅपची सेटिंग ‘ऑटो डाऊनलोड’वर असल्याने ही फाईल डाऊनलोड झाली व खात्यातून चार लाख 64 439 रुपये वजा झाले.

फाइल डाऊनलोड होताच मिळाला अ‍ॅक्सेस
सराफ यांच्या मोबाइलमध्ये एपीके फाइल डाऊनलोड होताच अज्ञातने त्यांच्या मोबाइलचा अ‍ॅक्सेस मिळविला त्यामुळे त्याला सर्व ओटीपी व इतर माहिती घेणे सहज शक्य झाले. खात्यातून पैसे काढले जात असल्याचे लक्षात येताच सराफ हे बँकेत गेले व खाते होल्ड केले. त्यामुळे उर्वरित रक्कम वाचली.

वायफायवर ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग टाळा
व्हॉटस्पवर काही फोटो, मेसेज अथवा काही व्हिडीओ आल्यास वायफायवर ‘ऑटो डाऊनलोड’ व्हावे म्हणून अनेक जण व्हॉटस्अ‍ॅपची सेटिंग ‘ऑटो डाऊनलोड’ ठेवत असतात मात्र केव्हा कोणती फाइल येईल व ती डाऊनलोड झाल्यास किती नुकसान होऊ शकते, हे सांगता येत नाही. त्यामुळे वायफायवर ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग टाळावी, असे जळगाव सायबर सेल पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी सांगितल.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !