यावल पंचायत समितीचे आरक्षण जाहिर ; गण खुले न झाल्याने दिग्गजांना धक्का
Yaval Panchayat Samiti reservation announced ; Veterans shocked as the ganas were not opened यावल (14 ऑक्टोबर 2025) : यावल तालुक्यातील पंचायत समितीच्या 10 गणांचे आरक्षण यावल तहसील कार्यालयात प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षेतखाली जाहिर करण्यात आले. सभापती पद सर्वसाधारण असल्याने अनेक दिग्गजांच्या गण खुले नसल्याने आशा मावळल्या तर पाडळसे व मारूळ हे गण सर्वसाधारण असून सोबत न्हावी गण नामाप्र आहे.
असे आहे आरक्षण
पंचायत समितीचे आरक्षण तहसील कार्यालयात सोमवारी दुपारी तीन वाजता काढण्यात आले. यात किनगाव, साकळी, दहिगाव, डांभुर्णी, भालोद या गणातील काँग्रेससह भाजपाचे अनेक दिग्गज पंचायत समितीच्या सर्वसाधारण जागेवर सभापती पदाकरीता आशा बाळगून होते मात्र आरक्षणाने त्यांचा हिरमोड केला. सर्वसाधारण जागा असल्याने आता गणांच्या आरक्षणानंतर पाडळसे व मारूळ हे गण सर्वसाधारण आहेत. सोबत न्हावी गण नामाप्र आहे व या तीन गणातील उमेदवार सभापती पदाचे दावेदार राहतील. गेल्या काही वर्षात तालुक्यातील काँग्रेसच्या दिग्गजांचा भाजपा पक्ष प्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढली आहे.





गण आरक्षण असे, कंसात पूर्वीचे आरक्षण
हिंगोणा- अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
सावखेडासीम- अनुसूचित जमाती महिला (सर्वसाधारण)
किनगाव- अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)
डांभूर्णी- अनुसूचित जमाती महिला (नामाप्र महिला)
न्हावी प्र यावल- नामाप्र (अनु.जमाती)
मारूळ- सर्वसाधारण (अनुसूचित जमाती महिला)
दहिगाव- सर्वसाधारण महिला (नामाप्र महिला)
साकळी- सर्वसाधारण महिला (नामाप्र)
भालोद- नामाप्र महिला (अनु जमाती महिला)
पाडळसे- सर्वसाधारण (अनु जाती महिला)
