भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात


भुसावळ (15 ऑक्टोबर 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त विद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने ग्रंथालयात उपलब्ध विविध ग्रंथसंपदेचे प्रदर्शन लावण्यात आले.

ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्याहस्ते करण्यात आले. ग्रंथपाल डॉ.व्ही.टी.भंगाळे यांनी ग्रंथ प्रदर्शनाची मांडणी केली. याप्रसंगी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका एस.ए. अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल.राणे, पर्यवेक्षक एस.पी.पाठक यांच्यासह विषय तज्ज्ञ देवानंद वागधरे, ज्येष्ठ शिक्षक बी.बी.जोगी, एस.एस.कापसे उपस्थित होते.






पंकज गाजरे, आसीफ तडवी, केतन जावळे, माधव बाविस्कर व संगणक विभागातील सारिका भारंबे यांचीही उपस्थिती होती. एस. पी.महाजन यांनी विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन परिचय व ग्रंथ साहित्य याचा परिचय करून देत जीवनातील वाचनाचे महत्त्व पटवून दिले. अधिकाधिक अवांतर वाचन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील ग्रंथ साहित्य संपदेचे अवलोकन करण्यात आले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !