भुसावळातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात वाचन व प्रेरणा दिन उत्साहात


भुसावळ (15 ऑक्टोबर 2025) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन व प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी पुष्पहार अर्पण केला.

तर वाचनाने होईल प्रगती : प्राचार्य
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्यांनी वाचनाच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी व मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच शैक्षणिक यश आणि आयुष्यभर शिक्षणासाठी मजबूत वाचन कौशल्य हे मूलभूत आहेत म्हणून शिक्षक, पालक व मुले यांनी वाचनात स्वतःला गुंतवून ठेवले तर प्रगती वृद्धिंगत होत जाते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचन केले.






यांची होती उपस्थिती
कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कमिटीच्या प्रमुख प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.प्राध्यापक संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.एस.एस.पाटील, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !