दीपनगर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार
Leopards roam freely in Deepnagar area भुसावळ (16 ऑक्टोबर 2024) : दीपनगर औष्णिक केंद्रातील एनडीएम पंप हाऊस परिसरात मंगळवारी रात्री बिबट्याचा संचार आढळून आला. यापूर्वीही दोन ते तीनवेळा कर्मचार्यांना या परिसरात बिबट्या आढळला आहे. यामुळे कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासकिय यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना नसल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बिबट्याच्या संचाराने वाढली भीती
तापीकाठावरील कंडारी, आयुध निर्माणी या परिसरात बिबट्याचा अधिवास आहे. यानंतर आता दीपनगर औष्णिक केंद्रातील एनडीएम पंप हाऊस परिसरातही मंगळवारी रात्री बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. यापूर्वीही कामगारांना बिबट्या आढळून आला आहे. यानंतर येथील कामगारांनी दीपनगर केंद्राच्या प्रशासनाला माहिती कळवली.





दीपनगर केंद्रात तीन शिफ्टमध्ये काम चालते. रात्री 12 वाजता घरी येणारे व त्याचवेळी कामगार जाणार्या कामगार तसेच त्यांच्या कुटूंबियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्य अभियंत्याने वन विभागाला यापूर्वीही कळवले नव्हते. यामुळे आता प्रशासनाकडून एखादी अनुचित प्रकार घडण्यापूर्वी कारवाई करणे अपेक्षीत आहे.
