भुसावळातील विघ्नहर्ता पब्लिकेशनने केली 60 हॉकर्स बांधवांची दिवाळी गोड
हॉकर्स बांधवांच्या चेहर्यावर फुलले हास्य : दहा वर्षांपासून अव्याहत उपक्रम
Vighnaharta Publication in Bhusawal made Diwali sweet for 60 hawkers भुसावळ (16 ऑक्टोबर 2024) : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिल्या जाणार्या वृत्तपत्राला ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता व अनेक अडचणी आल्यानंतरही न चुकता भल्या पहाटे चोखंदळ वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचणार्या भुसावळ शहरातील वृत्तपत्र हॉकर्स बांधवांची दिवाळी शहरताील विघ्नहर्ता पब्लिकेशनने गोड केली आहे. गुरुवार, 16 ऑक्टोबर रोजी विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी यांनी 60 हॉकर्स बांधवांना साडी, ड्रेस व मिठाईचे वाटप केले. गेल्या दहा वर्षांपासून विघ्नहर्ता पब्लिकेशनच्या माध्यमातून हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाने हॉकर्सही भारावले आहेत.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
दिव्य मराठीचे निवासी संपादक दीपक पटवे, युनिट हेड संजीव पाटील, वितरण विभागाचे राज्य प्रमुख प्रदीप पांडे, वितरण विभाग प्रमुख कैलास लोहार, वितरण विभागाचे नितीन पाखले,, दिव्य मराठी भुसावळचे ब्युरो चीफ हेमंत जोशी, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सराफ, जाहिरात विभागाचे सहकारी संजय ठाकूर, विघ्नहर्ता पब्लिकेशन्सचे संचालक रवींद्र निमाणी, देवेंद्र निमाणी, जय निमाणी, पत्रकार गणेश वाघ यांच्यासह हॉकर्स बांधव उपस्थित होते.






हॉकर्सची भूमिका मोलाची
प्रतिकुल परीस्थितीत आपल्या संसाराचा रहाटगाडा ओढणार्या हॉकर्स बांधवांप्रती भुसावळातील विघ्नहर्ता पब्लिकेशन्सचे संचालक रवींद्र निमाणी यांनी नेहमीच संवेदना जोपासली आहे. अडी-अडचणीत ते त्यांच्या नेहमीच धावून येतात. गुरुवारी बांधवांना साडी, पँट शर्ट कापड, नमकीन व मिठाईचा बॉक्स देवून त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
वृत्तपत्र पोहोचवण्यात हॉकर्सचे योगदान मोठे : रवींद्र निमाणी
तीनही ऋतुंमध्ये भल्या पहाटे समाजापर्यंत वृत्तपत्र पोहोचण्याचे काम हॉकर्स व वृत्तपत्र विक्रेते बांधव करतात व त्यांची दिवाळी गोड व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यापुढेही हा उपक्रम राबवत राहू, असे विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवींद्र निमाणी म्हणाले. डिजिटल युगात वृत्तपत्राचे महत्व आजही अबाधीत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य अंग असलेल्या वृत्तपत्राला पहाटेच वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्र हॉकर्स बांधवांचे योगदान मोठे असल्याचेही त्यांनी नम्रपणे नमूद केले.
