सक्षम नारी फाउंडेशनतर्फे आदिवासी वस्तीमध्ये फराळ, कपड्यांचे वाटप

गरजू कुटुंबांपर्यंत आनंद पोहोचवण्यासाठी प्रयत्न


Saksham Nari Foundation distributes snacks and clothes in tribal settlements भुसावळ (23 ऑक्टोबर 2025) : दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा या उक्तीप्रमाणे दिवाळीचा सण सर्वत्र आनंदात साजरा केला जातो. मात्र, समाजातील अनेक कुटुंबांसाठी दिवाळी हा सण नसून एक सामान्य दिवसच ठरतो. अशा गरजू कुटुंबांपर्यंत दिवाळीचा खरा आनंद पोहोचवण्यासाठी सक्षम नारी फाउंडेशनतर्फे एक समाजाभिमुख उपक्रम राबवण्यात आला.

आदिवासी बांधवांची दिवाळी गोड
यावलजवळील पांढरी वस्ती येथील आदिवासी तांड्यावर दिवाळीनिमित्त फराळाचे तसेच साड्या आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक महिलांच्या आणि कुटुंबांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले. फराळाचा घमघमाट, रंगीबेरंगी साड्यांची चमक, आणि नवीन कपड्यांची झळाळी यामुळे वस्तीवर खर्‍या अर्थाने दिवाळी उजळून निघाली. या उपक्रमात सक्षम नारी फाउंडेशनच्या डॉ.सुवर्णा गाडेकर, डॉ.दीप्ती पाटील, राजवीर पाटील, डॉ.वैशाली रामवंशी, पारूल वर्मा, संगीता जगताप, सुनीताा जोशी, शीतल भालेराव, गायत्री विसपुते, संघमित्रा ठाकणे, वंदना कांबळे, उज्वला बागुल, योगीता ठाकूर या उपस्थित होत्या.






यांनी केले सहकार्य
यशस्वीतेसाठी संगीता जगताप, जास्वंदी भंडारी, पल्लवी अंवाडे, शीतल मोरे यांनी विशेष मेहनत घेतली. सक्षम नारी फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमामुळे अनेक गरजू महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आनंदाच्या दिवाळीचा खरा अर्थ अनुभवता आला. ही दिवाळी त्यांच्या आयुष्यात आशेचा नवा उजेड घेऊन आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !