भुसावळातील शिवाजी नगरात जुगार अड्ड्यावर धाड : सात जुगारी जाळ्यात
Raid on gambling den in Shivaji Nagar, Bhusawal: Seven gamblers caught भुसावळ (25 ऑक्टोबर 2025) : शहरातील छत्रपती शिवाजी नगर भागात टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या झन्ना-मन्ना नावाच्या पत्यांच्या जुगारावर बाजारपेठ पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत सात जणांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या संशयीत आरोपींकडून जुगाराचे साहित्य आणि रोख एक हजार 910 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
या संशयीतांवर कारवाई
बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली की,शिवाजी नगर परिसरात काही इसम पत्यांचा जुगार खेळत आहेत. त्यानुसार रात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी पथक तयार करून ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत राजू तुळशीराम केथवास (45), योगेश लक्ष्मीनारायण मालविया (43), रोशन राजकुमार मेहरा (52), अजय मनोहर मेंढारे (55), संदीप सयाजी भंगाळे (40), राजू उर्फ राजेंद्र पाव्हणू वाघ (52) आणि मिलिंद निवृत्ती शिंदे (53) सर्व रा. शिवाजी नगर यांना अटक करण्यात आली.





