भुसावळ पालिका निवडणूक : शुक्रवारी अंतीम मतदार यादी होणार प्रसिध्द !
प्रशासनाकडून स्थळ पाहणीची प्रक्रिया पूर्ण
Bhusawal Municipality Election : Final voter list to be published on Friday! भुसावळ (26 ऑक्टोबर 2025) : नगरपालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी प्रशासनाने प्रारुप मतदार यादीवर तब्बल 5 हजार 399 हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर पालिका स्थळपरिक्षण करुन पुढील प्रक्रिया करणार आहे. यानंतर सुनावणी होऊन शुक्रवार, 31 ऑक्टोबरला अंतीम प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
प्रारूप यादी प्रसिद्ध
नगरपालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी प्रशासनाने प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. या मतदार यादीवर अखेरच्या मुदतीपर्यंत पालिकेकडे तब्बल 5 हजार 399 हरकती प्राप्त झाल्या होत्या. यानंतर पालिकेने दाखल झालेल्या हरकतींवर पर्यवेक्षकांच्या माध्यमातून स्थळ पाहणी केली. हरकतीमध्ये नागरिकांना जोडलेले रहिवासाचे पुरावे व अन्य तपशीलांची चौकशी करुन हरकती मान्य व अमान्य केल्या आहेत. आता मान्य झालेल्या हरकतींना मतदार यादीत जोडले जाईल. यासह अमान्य झालेल्या हरकती, आहे त्याच मतदार यादीत ठेवून अंतीम मतदार यादी 31 ऑक्टोंबरला प्रसिध्द केली जाणार आहे. ही अंतीम मतदार यादी आगामी निवडणूकीसाठी ग्राह्य धरली जाईल. यानंतरच्या काळात या यादीत कोणताही फेरबदल होणार नाही.





आता निवडणुकीची प्रतीक्षा
नगरपालिका प्रशासनाच्या प्रभाग रचना, आरक्षण सोडत ही प्रक्रिया झाली असून यानंतर 31 ऑक्टोबरला मतदार यादी प्रसिध्द होईल. यानंतर 7 नोव्हेंबर रोजी अंतीम मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द केली जाईल. अर्थात निवडणुकीसाठीची संपूर्ण प्रशासकिय प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्याची प्रतीक्षा आहे.
