कडक सॅल्यूट : रावेर पोलिसांनी दिड लाखांचे मंगळसूत्र महिलेला केले परत


Strict salute: Raver police returns mangalsutra worth Rs 1.5 lakh to woman रावेर (26 ऑक्टोबर 2025) : गर्दीत मंगळसूत्र तुटून पडल्यानंतर ते पोलिसांना सापडले. रावेर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे मूळ मालक शोधत त्यांना मंगळसूत्र परतले.

गर्दीत हरवले मंगळसूत्र
नरवेल, ता.मुक्ताईनगर सखुबाई प्रमोद धनगर या भाऊबीजेसाठी कांडवेल येथे जाणार असल्याने त्यांच्या दोन बहिणी शोभा सावळे (अहिरवाडी) व रुपाली सावळे (पिंपरी) यांनी रावेर बस स्थानकावर दुपारी बारापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. यानंतर ते रावेर शहरात भाऊबीजेसाठी कपडे खरेदी करण्यासाठी येथील बस स्टॅन्ड वरून शहरात येण्यासाठी निघाल्या. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर व खरेदी करणार्‍या महिला व पुरुषांची गर्दी पाहून अहिरवाडी येथील बहिणीने आपले मंगळसूत्र चोरीला जाऊ नये म्हणून पर्समध्ये ठेवले. तर सखुबाई धनगर यांनी सदर मंगळसूत्र काढून सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील महालक्ष्मी मंदिर रोडकडे जाणार्‍या रस्त्यावरील उजव्या बाजूच्या कोपर्‍यात पडले.






डॉ.आंबेडकर चौकातील वाहतूक पोलिस कर्मचारी गफार तडवी यांना मंगळसूत्र सापडले. कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस गफ्फार तडवी, रुबाब तडवी व होमगार्ड राहूल कासार यांनी मंगळसूत्र सापडल्याचे पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना सांगितले. हा प्रकार गुरुवार, 23 रोजी दुपारी घडली.

वाहतूक कर्मचारी गफ्फार तडवी, रुबाब तडवी, होमगार्ड राहुल कासार यांनी शोध मोहिम राबवून शनिवारी नरवेल येथील सखुबाई धनगर या महिलेस पोलीस ठाण्यात बोलवून सदर मंगळसूत्राची शहनिशा करून पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्याहस्ते मंगळसुत्र या महिलेच्या स्वाधीन करण्यात आले. मंगळसूत्र हातात मिळताच महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !