देवळाली-दानापूर ‘शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे’ चा विस्तार


Extension of Devlali-Danapur ‘Farmers’ Prosperity Special Train’ भुसावळ (31 ऑक्टोबर 2025) : शेतकरी आणि प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाने देवळाली ते दानापूर या‘शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे’ सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कृषी उत्पादनांची जलद आणि सुरक्षित वाहतूक शक्य होऊन शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेतर्फे गाडी क्रमांक 01053 देवळाली ते दानापूर ‘शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे’गाडी दि. 1 नोव्हेंबर 2025 पासून ते 18 एप्रिल 2026 पर्यंत प्रत्येक शनिवार रोजी देवळाली येथून रात्री 8.15 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी पहाटे 5.15 वाजता दानापूर येथे पोहोचेल.तसेच गाडी क्रमांक 01054 दानापूर ते मनमाड या मार्गावर 3 नोव्हेंबर 2025 पासून ते 20 एप्रिल 2026 पर्यंत प्रत्येक सोमवारी सकाळी 10 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी मंगळवारी सकाळी 10.30 वाजता मनमाड येथे पोहोचेल.






या विशेष रेल्वेमध्ये 10 व्हीपी डबे (प्रत्येकाची क्षमता 23 टन) तसेच 10 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. ही सेवा शेतकर्‍यांच्या उत्पादनांना मोठ्या शहरांत वेळेवर आणि कार्यक्षमतेने पोहोचविण्यास मदत करेल त्यामुळे त्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ आणि चांगला दर मिळेल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
मध्य रेल्वेने शेतकरी व प्रवाशांना या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !