यावलमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन
Tributes to Iron Man Sardar Vallabhbhai Patel on his birth anniversary in Yaval यावल (31 ऑक्टोबर 2025) : अखंड भारताचे शिल्पकार लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त यावल शहरातील खरेदी-विक्री संघात प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघाचे व्हा.चेअरमन अतुल भालेराव यांच्याहस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे व जिनिंग प्रेस संचालक बाळासाहेब फेगडे, माजी तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, संघाचे संचालक व माजी व्हाईस चेअरमन तेजस पाटील, माजी शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, शहर सरचिटणीस योगेश चौधरी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख अल्ताफ.तसेच संघाचे मॅनेजर संजय भोईटे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.





