भुसावळातील रेल्वेच्या वाणिज्य विभागातील कर्मचार्यांचा डीआरएम यांनी केला सन्मान
भुसावळ (1 नोव्हेंबर 2025) : भुसावळ विभागातील वाणिज्य विभागात वित्त वर्ष 2025-26 मधील एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत उत्कृष्ट कार्य करणार्या कर्मचार्यांचा गौरव करण्यासाठी वाणिज्य उत्कृष्टता पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात डीआरएम कार्यालयात आयोजित करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या सोहळ्याचा शुभारंभ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. कार्यक्रमात वाणिज्य विभागाने चालू आर्थिक वर्षात महसूलवाढ आणि कार्यक्षमता यामध्ये साध्य केलेल्या उल्लेखनीय यशाचे सादरीकरण करण्यात आले. या यशामागे कर्मचार्यांच्या समर्पित कार्याचा मोठा वाटा असल्याचे डीआरएम अग्रवाल यांनी आपल्या भाषणात नमूद करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी कर्मचार्यांना भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात 150 कर्मचारी आणि 3 संघ यांना उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.





यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास एडीआरएम (तांत्रिक) एम. के. मीना, विविध वरिष्ठ विभाग अधिकारी तसेच वाणिज्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तावना वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार तर विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. बी. तपस्वी यांनी आभार मानले. हा पुरस्कार सोहळा वाणिज्य विभागातील कर्मचार्यांसाठी प्रेरणादायी ठरला. तिकीट निरीक्षकांसोबत वाणिज्य विभागातील अन्य कर्मचार्यांचाही गौरव करण्यात आला.
