निमगावातील पाच जनावरे दगावली : शासनाकडून मदतीची अपेक्षा


Five animals killed in Nimgaon : Expect help from the government यावल (1 नोव्हेंबर 2025) : यावल तालुक्यातील निमगाव व टेंभी या दोन्ही गावात गुरा-ढोरांवर आलेल्या अज्ञात रोगामुळे तीन दिवसात चार गोवंश व एक म्हैस असे पाच जनावरे दगावली आहे. यात शेतकरी पशुपालकांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. अजुन काही जनावरे आजारी असून शेतकर्‍यांच्या जनावरांचा झालेल्या मृत्यू पाहता शासना कडून त्यांना मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी व पशू पालकांनी केली आहे.

अज्ञात आजाराने खळबळ
निमगाव व टेंभी, ता.यावल या गावात गुरा-ढोरांवर आलेल्या अज्ञात रोगामुळे एकच खळबळ उडाली. तीन दिवसात पाच जनावरे दगावली आहे. कैलाससिंग पाटील यांची 40 हजार रुपये किंमतीची गाय, अरुण पाटील, राजेंद्र पाटील, बाळू पाटील यांची प्रत्येकी 40 हजार रुपये किंमतीचे गोवंश तर अरुण पाटील यांची 80 हजार रुपये किंमतीची म्हैस असे जानावरे दगावली






अजूनदेखील गावातील चार पशूपालक शेतकर्‍यांच्या जनावरांची प्रकृती गंभीर आहे. गावात तीन दिवसात पशुपालक शेतकर्‍यांची पाच जनावरे दगावली व त्यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झालेे. हंगामातील पिकांचे देखील नुकसान व आता अज्ञात रोगात जनावरे दगावल्याने पशुपालक शेतकर्‍यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

शविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
पशुवैद्यकिय अधिकार्‍यांचे पथक उपाचाराकरीता गावात दाखल झाले होते व एका म्हैशीचे शवविच्छेदनदेखील करण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर पशूवैद्यकिय विभागाकडून या जनावरांचा मृत्यू कशामुळे झाला ? हे स्पष्ट होईल व पुढील आजारी जनावरांवर उपचाराची दिशा ठरेल.

पशुवैद्यकिय विभागाचा अहवाल मागवणार
पशूपालक शेतकर्‍यांच्या अशा प्रकारे अज्ञात रोगामुळे दगावलेल्या जनावरांच्या संर्दभातील अहवाल आपण पशू वैद्यकिय विभागाकडून मागवून घेवू व कशा प्रकारे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देता येईल या ाबत वरिष्ठांशी चर्चा करून नक्कीचे पशुपालकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !