भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिवस उत्साहात


National Integration Day celebrated with enthusiasm at De.N.A.Bhole College in Bhusawal भुसावळ (1 नोव्हेंबर 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एकका अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान थोर, कायदेतज्ज्ञ, लोहपुरुष,भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

भारताला बनवले अखंड राष्ट्र
प्राचार्य फालक म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर भारतासमोर सर्वात मोठे आव्हान होते. देशातील 562 संस्थानांचे एकत्रीकरण ही जबाबदारी स्वीकारून सरदार पटेल यांनी अथक परिश्रम घेतले आणि बुद्धिमत्तेच्या, दूरदृष्टीच्या जोरावर भारताला एक अखंड राष्ट्र बनवले त्यामुळेच त्यांना भारताचे एकीकरणकर्ता आणि ‘आर्यन मॅन ऑफ इंडिया’असे गौरवाने संबोधले जाते. त्यांच्या नेतृत्वात भारताने केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचा मार्ग धरला, असेही त्यांनी सांगितले होते






राष्ट्रीय एकात्मता दिवस हा 31 ऑक्टोबर हा दिवस केवळ पटेल जयंती नाही, तर राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश आहे. देशातील प्रत्येक नागरिकामध्ये एकतेची भावना जागवणे होय धर्म, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन भारतीयत्वाची ओळख मजबूत करणे होय आणि नव्या पिढीला देशप्रेम व एकजूट यांचे मूल्य शिकवणे आहे.

आजच्या आधुनिक काळात तंत्रज्ञान, विकास, आणि प्रगतीसोबत अनेक आव्हानेही आहेत विभाजन, मतभेद, आणि असहिष्णुता. अशा वेळी आपल्याला पटेलजींच्या विचारांची आणि त्यांच्या दृढतेची आठवण ठेवणे आवश्यक आहे. आपण जर प्रत्येकजण मी आधी भारतीय आहे हे मनापासून मान्य केले, तर खरी राष्ट्रीय एकता आणि प्रगती साध्य होईल असे सांगितले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर, कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांनी गांधी पुतळा ते सरदार पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत युनिट मार्चमधे सहभाग घेतला. यावेळी रासेयो अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.संजय बाविस्कर, प्रा.आर.डी.भोळे, प्रमोद नारखेडे, विजय पाटील, प्रकाश सावळे, सुनील ठोसर आदी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !