भुसावळातील भोळे महाविद्यालयाचा देवांश कोळीची विद्यापीठ तलवारबाजी (फेन्सिंग) संघात निवड
Devansh Koli of Bhole College, Bhusawal, selected in the university fencing team भुसावळ (3 नोव्हेंबर 2025) : भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचा प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी देवांश कोळी याने फैजपूरात झालेल्या आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी/फेन्सिंग स्पर्धेत सायबर व फॉइल या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला.
शिरपूरात आंतर विभागीय फेन्सिंग स्पर्धेत सायबर या प्रकारात त्याने प्रथम क्रमांक मिळवल्याने त्याची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धा अमृतसर पंजाब साठी निवड झाली. ही स्पर्धा दिनांक 10 ते 12 नोव्हेंबर 2025 रोजी गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर येथे होत आहे.





