यावल न्यायालयात वकील संघाकडून शेवगाव न्यायालयातील वकिलावरील हल्ल्याचा निषेध
Lawyers’ association condemns attack on lawyer in Shevgaon court in Yaval court यावल (4 नोव्हेंबर 2025) : यावल न्यायालयात सोमवारी वकील संघाने एकत्र येत शेवगाव न्यायालयात वकीलावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. उलट तपास केल्याच्या रागातुन शेवगाव न्यायालयातील वकीलावर एकाने वकीलास मारहाण केली होती. याववल वकील संघाने लाल पट्टी लावून कामकाज करीत या घटनेेचा निषेध नोंदवला.
यांची होती उपस्थिती
यावल न्यायालयात सोमवारी यावल वकील संघाचे अध्यक्ष अॅड.एस.जी. कवडीवाले, सचिव अॅड.शेखर एस.तडवी, अॅड.राजेश पी.गडे, अॅड.के.डी.पाटील यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली. शेवगाव न्यायालयातील वकिलावर झालेला हल्याप्रकरणी यावल वकील संघातर्फे निषेध नोंदवला. दिवभराचे कामकाज लाल पट्टी लावून करण्यात आले.





वकीलाला मारहाणीचा निषेध
अहिल्यानगर येथील शेवगाव न्यायालयात उलट तपास झाल्याचा राग येऊन एका फिर्यादीने वकिलास मारहाण केली होती तसेच इतर न्यायालयातील वकिलांवर होणारे हल्ले विरुद्ध वकीलाना कायद्याचे संरक्षण मिळावे म्हणून यावल वकील संघातर्फे अॅडवोकेट प्रोटेक्शन अॅक्ट तत्काळ मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अॅड. नितीन एम.चौधरी, अॅड.एस.आर लोंढे, अॅड.गोविंद एम.बारी, अॅड.अजय एम.कुलकर्णी, अॅड.विनोद परतणे, अॅड.उमेश सी.बडगुजर, अॅड.खालीद ए. शेख, अॅड.निवृत्ती पी.पाटील, अॅड.दत्तात्रय सावकारे, अॅड.किशोर. डी.सोनवणे, अॅड.अशोक आर.सुरळकर, अॅड.धीरज व्ही.चौधरी, अॅड.याकूब ए.तडवी, अॅड.मोहित शेख, अॅड.गौरव पाटील, अॅड.रितेश पी.बारी, अॅड.भूषण महाजन, अॅड.रियाज पटेल, अॅड.रोहित इंधाते, अॅड. अतुल भास्कर उपस्थित होते.
