रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : उद्या देवळाली मेमूसह दादर एक्स्प्रेस रद्द
Attention train passengers : Dadar Express including Deolali Memu cancelled tomorrow भुसावळ (20 नोव्हेंबर 2025) : भुसावळ-भादलीदरम्यान रेल्वेतर्फे गर्डर बसवण्यासह अन्य कामांसाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला असून शुक्रवार, 21 रोजी भुसावळ-देवळाली मेमूसह भुसावळ-दादर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
विशेष ट्रॅफिक ब्लॉक
भुसावळ-भादली दरम्यान पूल क्र. 435/1, 435/4 व 439/1 चे पुनर्बांधणी कामांतर्गत आरएच गर्डर बसविण्याकरिता विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. भुसावळ विभागातील ईगतपुरी-भुसावळदरम्यान खंड दरम्यान पूल क्रमांक 435/1, 435/4 आणि 439/1 यांच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. या कामांतर्गत अप व डाऊन मार्गांवर आरएच गर्डर बसविणे तसेच सेगमेंटल बॉक्स ‘विंच’द्वारे पुश-थ्रू पद्धतीने बसविण्याचे काम होत आहे. ही कामे सुरक्षित व कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करण्यासाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आल्याचे रेल्वेने कळवले आहे.

या गाड्या शुक्रवारी रद्द
गाडी क्रमांक 11113 देवळाली-भुसावळ मेमू तसेच गाडी क्रमांक 11114 भुसावळ-देवळाली मेमू व गाडी क्रमांक 09049 दादर -भुसावळ विशेष एक्स्प्रेस व गाडी क्रमांक 09050 भुसावळ -दादर विशेष एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.


