कोकणात फिरायला निघाले मात्र थार कार दरीत कोसळून चार तरुणांचा मृत्यू
Four youths died after Thar car fell into a valley while going for a walk in Konkan रायगड (20 नोव्हेंबर 2025) :नवी कोरी थार घेतल्यानंतर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावाचे तरुण कोकणात फिरण्यासाठी निघाले मात्र नियंत्रण सुटल्याने कार ताम्हिणी घाटात 500 फूट दरीत कोसळल्याने चौघांचा मृत्यू ओढवला तर उर्वरीत दोघांचा शोध सुरू आहे.
अपघातात प्रथम चव्हाण, पुनित शेट्टी, साहील बोटे, महादेव कोळी, ओंकार कोळी, शिवा माने या तरुणांचा मृत्यू झाला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी अपघात
पुण्यातील काही तरुण मंगळवारी रात्री कोकणात फिरायला निघाले होते मात्र रात्रीच्या सुमारास ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर हा अपघात झाला. मंगळवारपासून हे तरुण संपर्कात नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. मोबाईल लोकेशन तपासले असता, ते रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणार्या ताम्हिणी घाटात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी स्थानिक रेस्क्यू टीम आणि पोलिसांच्या मदतीने शोध घेतल्यानंतर 500 फूट खोल दरीत चक्काचूर झालेली थार आढळली.
20 दिवसांपूर्वीच घेतली होती नवीन कार
ज्या गाडीचा अपघात झाला ती ‘थार’ कार अवघ्या 20 दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती. नवीन गाडीतून फिरण्यासाठी निघालेल्या या तरुणांचा प्रवास अखेरचा ठरला. कारमध्ये एकूण 6 पुरुष प्रवासी होते.
माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अद्याप दोन जण बेपत्ता असल्याने रेस्क्यू टीम त्यांचा कसून शोध घेत आहे.


