भुसावळ पालिका निवडणूक : जातीचे दाखले मिळविण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात अर्जदारांची गर्दी

निवडणुकीच्या काळातही वेळ काढून दिले जाताय दाखले


भुसावळ (21 नोव्हेंबर 2025) : निवडणुकीच्या काळात महसूल यंत्रणा कामात व्यस्त असतानाही विविध जातीचे दाखल मिळविण्यासाठी अर्जदारांची प्रांताधिकारी कार्यालयात गर्दी होत आहे. निवडणुकीच्या कामातून वेळ काढून नायब तहसीलदार संतोष विनंते, प्रांताधिकारी जितेद्र पाटील हे ऑनलाइन स्वाक्षरी करून देत आहे. यामुळे दाखले मिळविण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात येणार्‍यांना दिलासा मिळत आहे.

गर्दीच्या काळाताही दाखल्यांचा दिलासा
निवडणुकीच्या ताण-तणावाच्या काळात महसूल प्रशासन विविध कामात गुंतलेले असतानाही नागरिकांच्या जातीच्या दाखल्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून मोठी गर्दी दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांची कमतरता भासू लागल्यानंतर बुधवारी अर्जदारांनी कार्यालयात धाव घेतली.



प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी निवडणूक कामाच्या व्यापातून वेळ काढत ऑनलाइन स्वाक्षरीद्वारे दाखले मंजूर करण्यास गती दिली आहे. त्याचप्रमाणे नायब तहसीलदार संतोष विनंते हेही दाखल्यांच्या प्रक्रियेत वेगाने काम करीत असल्याने अर्जदारांना मोठा दिलासा मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून विविध जातींचे दाखले मिळविण्यासाठी अनेक नागरिकांनी अर्ज दाखल केले होते. दाखले न मिळाल्याने बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात रांग लागल्या. अनेक अर्जदारांनी सकाळपासूनच दाखले मिळावेत म्हणून कार्यालयात उपस्थिती लावली. प्रशासनाच्या तत्परतेमुळे दाखल्यांच्या मंजुरी प्रक्रियेला वेग आला असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !