शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासह प्रभागातील मूलभूत समस्या सोडवणार ! : भुसावळातील प्रभाग नऊमधील उमेदवार ममता डागोर यांची ग्वाही


भुसावळ (25 नोव्हेंबर 2025) : रस्ते, पाणी, पथदिवे या मूलभूत समस्या सोडवण्यासोबतच शासनाच्या विविधांगी योजनांचा लाभार्थींना कशा पद्धत्तीने लाभ मिळेल यादृष्टीने नगरसेवकाचे व्हिजन असावे व मतदारांनी आपल्याला प्रभागातून संधी दिल्यास निश्चितपणे आपण प्रभागाचा कायापालट करू, असा विश्वास भुसावळातील प्रभाग क्रमांक 9 ब मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिलेल्या ममता अजय डागोर यांनी व्यक्त केला. ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ ने उमेदवाराशी संवाद साधला असता त्यांनी प्रभागाच्या विकासाविषयी अनेक बाबी स्पष्ट केल्या.

नगरसेवकपदाची संधी मिळाल्यास प्रभागाचा कायापालट करणार
अजित पवार गटाच्या उमेदवार ममता डागोर यांनी स्पष्ट केले की, प्रभागातील नागरिकांच्या खरे रस्ते, पाणी, पथदिवे या प्रमुख समस्या असतात व त्यांचे निवारण करण्यासोबत त्यांचे आरोग्य चांगले व अबाधीत राहण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे शिवाय तरुणांसाठी व्यायामशाळा, ज्येष्ठांसाठी वाचनकट्टा आदी उपक्रम राबवता येतील. प्रभागात नियमित स्वच्छता होण्यासाठी घंटागाडी नियमित सुरू करण्यासह वेळेवर पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे शिवाय शासनाच्या विविध योजना असून त्यांची जनजागृती योग्य पद्धत्तीने झाल्यास नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकेल. प्रभागातील मतदारांनी आपल्याला नगरसेवक होण्याची संधी दिल्यास या सर्व बाबींचा लाभ आपण मतदारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी ममता डागोर यांनी बोलताना दिली.




जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार
प्रभागातील समस्या सोडवण्यासोबतच काही समस्यांबाबत पालिका सभागृहातही आवाज उचलणे ही त्या-त्या प्रभागातील नगरसेवकाची जवाबदारी आहे व प्रभाग नऊ ब मधून आपल्याला मतदारांनी संधी दिल्यास निश्चितपणे आपण जनतेच्या प्रश्नांना निश्चितपणे वाचा फोडू, असा आशावाद उमेदवार ममता डागोर यांनी व्यक्त केला.

पक्ष श्रेष्ठींचे आशीर्वाद
राष्ट्रवादी अजित पवार गटातील सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ पदाधिकार्‍यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद आपल्याला लाभले आहेत. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असून आगामी काळात आणखी प्रचाराला वेग देणार असल्याचे ममता डागोर यांनी सांगत निश्चितपणे जनमताचा कौल आपल्याच बाजूने असेल, असा आशावादही व्यक्त केला.

पत्नीच्या विजयासाठी पतीही रिंगणात
याच भागातील रहिवासी असलेल्या ममता डागोर यांच्यासह त्यांचे पती समाजसेवक अजयकुमार डागोर तसेच त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते दररोज सकाळी व सायंकाळी प्रभागातील मतदारांच्या डोअर टू डोअर जावून भेटी-गाठी घेत आहेत. मतदारांचे आशीर्वादही दाम्पत्याला लाभत असून पत्नीच्या विजयासाठी पती अजय कुमार डागोर यांनीही कंबर कसली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !