भुसावळात 27 रोजी भाजपा उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांच्या प्रचारार्थ 27 रोजी महारॅली
भुसावळ (25 नोव्हेंबर 2025) : भुसावळ नगरपालिका निवडणुकीतील भाजपा-शिवसेना, रिपाइं, लहुजी शक्ती सेना महायुतीतील नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ तसेच प्रभाग क्रमांक 14 अ चे उमेदवार राजेंद्र नाना आवटे व ब मधील महिला उमेदवार अंकिता राजेंद्र खोले-पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवार, 27 रोजी दुपारी चार वाजता राजेंद्र आवटे यांच्या संपर्क कार्यालयातून प्रचार रॅली निघणार आहे.
मंत्री संजय सावकारे यांचा असेल सहभाग
महारॅलीत मंत्री संजय सावकारे यांचा सहभाग राहणार आहे. भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांच्यासह प्रभाग 14 अ व ब मधील उमेदवार राजेंद्र आवटे व अंकिता राजेंद्र खोले-पाटील यांच्या प्रचारार्थ ही रॅली निघेल. या रॅलीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





