उद्याची मतमोजणी रद्द : 21 डिसेंबरला जाहीर होणार निकाल


Tomorrow’s counting cancelled: Results to be announced on December 21 नागपूर (2 डिसेंबर 2025) : राज्यात नगरपालिका निवडणुकीसाठी शांततेत मंगळवार, 2 रोजी मतदान होत असून 3 रोजी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही मतमोजणी आता रविवार, 21 डिेसेंबर रोजी होणार असून तो पर्यंत आचारसंहिता मात्र कायम राहणार आहे.

काय घडले खंडपीठात
राज्य निवडणूक आयोगाने 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल, असे सांगितले होते मात्र काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने आयोगाने आपल्या कार्यक्रमात बदल करत, ज्या ठिकाणी वाद सुरू आहे, तेथे 20 डिसेंबर मतदान व 21 डिसेंबरला निकाल असा नवीन आदेश देऊन परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली. या पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला. बुधवार, 3 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी रद्द करण्यात आली असून रविवार, 21 डिसेंबरलाच सर्व ठिकाणचा निकाल जाहीर होईल व तोपर्यंत आचारसंहिता कायम असेल.

सर्वच ठिकाणाचा निकाल 21 रोजी लागणार
खंडपीठाने सोमवारच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या वकिलांना थेट विचारणा केली होती, सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल 21 डिसेंबरलाच देता येतील का? न्यायालयाने विचारलेल्या या प्रश्नामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले होते. आयोगाच्या वकिलांनी मात्र यावर तात्काळ उत्तर न देता, आज दुपारी यासंदर्भातील निवेदन सादर करू असे सांगितले होते. त्यानुसार आता न्यायालयाने सर्वच ठिकाणचा निकाल आता 21 डिसेंबरलाच लागणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !