पालिका निवडणुकांचा निकाल लांबल्यानंतर फडणवीस स्पष्टच म्हणाले ; नियमांचा अर्थ चुकीचा लावला


मुंबई (2 डिसेंबर 2025) : राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी सर्वत्र निवडणूक झाली मात्र या निवडणुकीचा निकाला आता 21 डिसेंबरला जाहीर होणार असल्याने यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या इतक्या वर्षांच्या राजकारणाच्या अनुभवात हा प्रकार प्रथमच पाहतोय. निवडणुका जाहीर झाल्या, मतदानही झाले, पण निकाल इतक्या वेळाने लागणार आहे. कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे निकाल पुढे ढकलला जाणे लोकशाहीच्या तरी पद्धतीला अनुरूप नाही. त्यांनी नमूद केले की, हे प्रकार राजकीय खोलात जातात, पण त्याचा सर्वाधिक फटका अनेक उमेदवार व कार्यकर्त्यांना बसणार आहे.

नियमांचा लावला चुकीचा अर्थ
फडणवीस पुढे म्हणाले की, मी निवडणूक आयोगावर आरोप करणार नाही, पण ज्यावेळी नियमांचा चुकीचा अर्थ लावला जातो, तेव्हा प्रक्रियेवर प्रश्न येते. त्यांनी सांगितले की, जिथे सर्व काही योग्य पद्धतीने पार पडले आहे, तिथेही निकाल पुढे ढकलला गेला हे न्यायालयाने केलेले आहे. निवडणूक आयोगाने पुढच्या निवडणुका योजताना या चुका टाळाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

फडणवीस यांनी एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणूकच पुढे ढकलायची हे अतिशय चुकीचे असल्याचेही म्हटले होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !