भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा


भुसावळ (9 डिसेंबर 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मंगळवार, 9 डिसेंबर रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत शाळेतील 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

यात विद्यार्थी हे डॉक्टर, पायलट, मिल्ट्री मॅन, पोलीस मॅन, पोस्टमॅन, शेतकरी, शिक्षक, भाजीविक्रेता अशा विविध रूपात सहभागी झाले. शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना बक्षीस देऊन मार्गदर्शन केले.





स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून हर्षला चौधरी यांनी काम पाहिले. प्रसंगी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर, स्मिता जाधव, वर्जनिया बर्नार्ड, स्मिता नन्नवरे, मनीषा चौधरी, क्रिस्टीना साबळे, चेतना झोपे, एलिजा फ्रान्सिस, रश्मी पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन फर्लीन छाबडा, लॉएर्टा ब्राऊन यांनी तर आभार स्मिता जाधव यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !