भुसावळात उद्या रिपब्लिकन सेना जळगाव जिल्हा बांधणी संदर्भात महत्वपूर्ण जिल्हा बैठक
भुसावळ (10 डिसेंबर 2025) : सरसेनानी रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन कामगार सेना, रिपब्लिकन महिला सेना, रिपब्लिकन युवा सेना जळगांव जिल्हा बांधणी संदर्भात जिल्हा बैठक रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा बैठकिस रिपब्लिकन कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, रिपब्लिकन महिला सेना जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे प्रमुख मार्गदर्शन करतील.
ही बैठक गुरुवार, 11 रोजी दुपारी एक वाजता शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात होत आहे. जळगाव जिल्ह्यातील तरुण, युवा, कामगार व महिला तसेच आंबेडकर चळवळीतील, संविधान प्रेमी व रिपब्लिकन सेनेमध्ये काम करायला इच्छुक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन जिल्हा नेते दिनेश इखारे, जिल्हा उपाध्यक्ष मेजर मकासरे, जिल्हा महासचिव वंदना आराक यांनी केले आहे.



