जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत यावलच्या बाल संस्कार विद्यामंदिराची सानवी गडे प्रथम
यावल (10 डिसेंबर 2025) : जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ, जळगाव आयोजीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेतील पहिल्या गटात ‘माझे उद्याचे स्वप्न’ या विषयावरील वकृत्व स्पर्धेत बाल संस्कार विद्या मंदिराची सातवीची विद्यार्थिनी सानवी पंकज गडे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
जळगावच्या ए.टी.झांबरे विद्यालयात झालेल्या स्पर्धेत जिल्हाभरातून सर्व तालुक्यातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सानवी गडे हिने परखडपणे आपले विचार मांडून सर्व परीक्षकांचे व उपस्थितांचे मन जिंकले व प्रथम क्रमांक पटकावला.




या यशानंतर तिच्यावर शाळेचे शिक्षक प्रशांत महाजन, वडिल प्रा.पंकज गडे, आई सुवर्णा गडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष महेश वाणी, मुख्याध्यापक सुनील माळी, संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि नातेवाईकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.