भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयातील प्रतीक अवसरमलची विद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड


Prateek Avasarmal from De.N.A. Bhole College, Bhusawal, selected for the University Kabaddi Tournament भुसावळ (12 डिसेंबर 2025) : जळगाव विभाग क्रीडा समिती अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत अ‍ॅड.बाहेती महाविद्यालय, जळगांव येथे तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतर विभागीय कबड्डी स्पर्धा नाईक महाविद्यालय, शहादा येथे झाल्या. त्यात दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतीक अवसरमल (एस.वाय.बी.ए.) याने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धा, इंदूर मध्यप्रदेशसाठी निवड झाली तसेच महाराष्ट्र राज्य विद्यापीठ स्तरीय क्रीडा महोत्सव स्पर्धा स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडसाठी निवड झाली. स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल व निवड झाल्याबद्दल जळगाव विभाग प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी, कबड्डी प्रशिक्षक प्रकाश सावळे उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !