भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलचा सामाजिक समारंभासह मासिक प्रकाशन 18 डिसेंबरला


Monthly publication of N.K. Narkhede English Medium School in Bhusawal with social function on 18th December भुसावळ (12 डिसेंबर 2025) : शहरातील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन.के.नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे वार्षिक सामाजिक समारंभ आणि शालेय मासिक‘रायझिंग स्टार्स 2025-26’चा प्रकाशन सोहळा गुरुवार, 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. समारंभ महामार्गावरील बालाजी लॉन येथे होणार आहे.

यांची होती उपस्थिती
समारंभाचे अध्यक्षस्थानी मकरंद एन.नारखेडे असतील. मुख्य अतिथी म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. किशोर एन.नारखेडे, सचिव पी.व्ही.पाटील, सदस्य विकास पाचपांडे, समिती सदस्य भाग्येश एम. नारखेडे, श्रीनिवास एन. नारखेडे, प्रमोद नेमाडे (सहसचिव), डॉ.संजीव एन.नारखेडे (समिती सदस्य) आणि राज के. नारखेडे (समिती सदस्य) हे असतील.





शाळेच्या प्राचार्या अर्चना कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि कला सादरीकरणांनी कार्यक्रमाला रंगत येणार आहे. शैक्षणिक वर्षभरातील उपक्रमांचे दर्शन घडवणारे शालेय मासिक‘रायझिंग स्टार्सचे अनावरण हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवे प्रोत्साहन मिळणार आहे. विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा वार्षिक समारंभ उत्साहात पार पडणार असल्याची माहिती संस्थेतर्फे दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !