यावल शेत शिवारात केळी कापणीवरुन तरुणावर हल्ला


Youth attacked over banana harvesting in Yaval farm यावल (12 डिसेंबर 2025) : यावल शहराच्या शेत शिवारात केळी कापणीच्या कारणावरून केळीच्या शेतात वाद झाला आणि या वादातून एका 30 वर्षीय तरुणावर एकाने विळ्याने तसेच लोखंडी हुकने हल्ला करून त्याला जबर दुखापत केली. ही घटना बुधवारी घडली. या प्रकरणी यावल पोललिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले तरुणासोबत ?
यावल शहराच्या शेत-शिवारात अरुण पाटील यांचे शेत गट क्रमांक 2188 आहे. या शेतात बुधवारी केळी कापणीसाठी मजूर गेले होते. तेथे केळी कापणी सुरू असताना शेख जुबेर शेख जहीर (30 रा.आझाद नगर, यावल) या तरुणाला शोएब युसुफ कजबी उर्फ नकली (सईद पुरा, यावल) याने शिवीगाळ करून मारहाण केली व लोखंडी विळा तसेच लोखंडी हुकने त्याच्या डोक्यावर पाठीवर मारून जबर दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !