फागणेजवळ भीषण अपघात : जळगावातील दोघे जागीच ठार


Fatal accident near Phagne : Two from Jalgaon killed on the spot धुळे (12 डिसेंबर 2025) : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत जळगावातील दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. हा अपघात धुळे-जळगाव मार्गावरील फागणे गावाजवळ गुरुवारी सायंकाळी घडला. दीपक मोतीलाल भामरे (45) आणि पन्नालाल भगवान वर्मा (दोन्ही रा. जळगाव) अशी मृतांची नावे आहेत.

अज्ञात वाहनाची धडक
दीपक भामरे आणि पन्नालाल वर्मा हे दोघेजण दुचाकी (एम.एच. 19 सी.ई.1719) क्रमांकाच्या दुचाकीवरून धुळ्याहून जळगावकडे जात असताना फागणे गावाच्या पुढे एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.





अपघातानंतर धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवले. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !