धक्कादायक : अपात्र लाभार्थींनी लाटले लाडक्या बहिण योजनेचे 165 कोटी


Shocking: Ineligible beneficiaries embezzled Rs 165 crore from Ladkya Bahin Yojana पुणे (12 डिसेंबर 2025) : भाजपला सत्तेवर आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या लाडकी बहिण योजनेत तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थींनी हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची लेखी उत्तरात कबुली दिली आहे. 12 हजार 431 पुरुषांनी 25 कोटी रुपये तर 77 हजार अपात्र महिलांनी 140 कोटी तर 9526 शासकिय महिला कर्मचार्‍यांनी 14.50 कोटी रुपये लाटल्याचं आदिती तटकरेंनी माहिती देताना म्हणाल्या आहेत.

शासकीय अधिकारी कर्मचार्‍यांकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावरती रितसर कारवाई केली जाणार असल्याचंही अदिती तटकरे यांनी उत्तर देताना म्हटलं आहे.



प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची मुख्यमंत्री यांची घोषणा कागदोपत्रीच असल्याचंही समोर आलं आहे. या योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. मात्र अद्यापही शासन निर्णय जारी केला नाही. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत लेखी उत्तरात माहिती दिली आहे.

अपात्र लाभार्थींकडून लवकरच होणार वसुली
योजना सुरू करण्यात आली तेव्हा सरसकट महिलांनी अर्ज केले होते. सुरूवातीला या योजनेसाठी अर्ज करताना आधार क्रमांक, बँक खाते आणि पात्रतेची माहिती तपासण्यासाठी तांत्रिक पडताळणी होती मात्र काही जिल्ह्यांत डेटा व्हेरिफिकेशनमध्ये गंभीर त्रृटी निर्माण झाल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे अपात्र महिलांनीही अर्ज करून लाभ घेतला.

या योजनेत फक्त पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी घालून दिलेल्या अटींची पुढे पुर्तता करत असतानाच यामध्ये शासकिय महिला कर्मचार्‍यांनी देखील अर्ज केल्याचं समोर आलं आहे. शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावरती रितसर कारवाई केली जाणार असल्याचंही अदिती तटकरे यांनी उत्तर देताना सांगितले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !